{"s":"dev","lang":"hi","v":{"refrain":{"l":["आरती साईबाबा । सौख्यदातार जीवा ।","चरणरजातळीं द्यावा दासां विसावा, भक्तां विसावा ॥"]},"stanza-1":{"l":["जाळुनियां अनंग । स्वस्वरूपीं राहे दंग ।","मुमुक्षुजनां दावी । निज डोळां श्रीरंग ॥"]},"stanza-2":{"l":["जया मनीं जैसा भाव । तया तैसा अनुभव ।","दाविसी दयाघना । ऐसी तुझी ही माव ॥"]},"stanza-3":{"l":["तुमचें नाम ध्यातां । हरे संसृतिव्यथा ।","अगाध तव करणी । मार्ग दाविसी अनाथा ॥"]},"stanza-4":{"l":["कलियुगीं अवतार । सगुणब्रह्म साचार ।","अवतीर्ण झालासे । स्वामी दत्त दिगंबर ॥"]},"stanza-5":{"l":["आठां दिवसां गुरुवारीं । भक्त करिती वारी ।","प्रभुपद पहावया । भवभय निवारी ॥"]},"stanza-6":{"l":["माझा निजद्रव्यठेवा । तव चरणरजसेवा ।","मागणें हेंचि आतां । तुम्हां देवाधिदेवा ॥"]},"stanza-7":{"l":["इच्छित दीन चातक । निर्मळ तोय निजसुख ।","पाजावें माधवा या । सांभाळ आपुली भाक ॥"]}}}