{"s":"dev","lang":"hi","v":{"refrain":{"l":["काकड आरती करीतों साईनाथ देवा ।","चिन्मयरूप दाखवीं घेउनि बालक-लघुसेवा ॥"]},"stanza-1":{"l":["काम क्रोध मद मत्सर आटुनी कांकडा केला ।","वैराग्याचे तूप घालुनी मी तो भिजविला ।","साईनाथगुरुभक्तिज्वलनें तो मी पेटविला ।","तद्वृत्ती जाळुनी गुरुनें प्रकाश पाडिला ।","द्वैत-तमा नासूनी मिळवी तत्स्वरूपीं जीवा ॥"]},"stanza-2":{"l":["भू-खेचर व्यापूनी अवघे हृत्कमलीं राहसी ।","तोचि दत्तदेव तू शिरडी राहुनी पावसी ।","राहुनि येथे अन्यत्रहि तू भक्तांस्तव धांवसी ।","निरसुनियां संकटा दासा अनुभव दाविसी ।","न कळे त्वल्लीलाही कोण्या देवा वा मानवा ॥"]},"stanza-3":{"l":["त्वद्यशदुंदुभीनें सारें अंबर हें कोंदलें ।","सगुण मूर्ति पाहण्या आतुर जन शिरडी आले ।","प्राशुनि त्वद्वचनामृत अमुचे देहभान हरपलें ।","सोडूनियां दुरभिमान मानस त्वच्चरणीं वाहिले ।","कृपा करूनियां साईमाउले दास पदरीं घ्यावा ॥"]}}}