{"s":"dev","lang":"hi","v":{"refrain":{"l":["जय जय साईनाथ आतां पहुडावें मंदिरीं हो ।","आळवितों सप्रेमें तुजला आरति घेउनि करीं हो ॥"]},"stanza-1":{"l":["रंजविसी तूं मधुर बोलुनी माय जशी निज मुला हो ।","भोगिसि व्याधी तूंच हरुनियां निजसेवकदुःखाला हो ।","धांवुनि भक्तव्यसन हरिसी दर्शन देसी त्याला हो ।","झाले असतील कष्ट अतिशय तुमचे या देहाला हो ॥"]},"stanza-2":{"l":["क्षमा शयन सुंदर ही शोभा सुमनशेज त्यावरी हो ।","घ्यावी थोडी भक्तजनांची पूजनादि चाकरी हो ।","ओंवाळीतों पंचप्राण ज्योति सुमती करीं हो ।","सेवा किंकर भक्त प्रीती अत्तर परिमळ वारी हो ॥"]},"stanza-3":{"l":["सोडुनि जाया दुःख वाटतें साई त्वच्चरणांसी हो ।","आज्ञेस्तव हा आशीरप्रसाद घेउनि निजसदनासी हो ।","जातों आतां येऊं पुनरपि त्वच्चरणाचे पाशीं हो ।","उठवूं तुजला साईमाउले निजहित साधायासी हो ॥"]}}}